दिवाळीसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी म्हणून मी इंस्टाग्राम वर आलेली एक लिंक चेक केली. 'वाणी कुर्तीज माय शॉपीफाय डॉट कॉम' अशी ती लिंक होती. त्यावर 'टू गुड टू बी ट्रू' अशा ऑफर्स होत्या. अडीचशे रुपयाला मस्त कुर्ता मिळत होता. शिवाय दोन वर एक फ्री... 1434 रुपयांची खरेदी डोकं गहाण ठेवून मी केली. ही गोष्ट आहे तीस ऑक्टोबरची, कालची तारीख 7 नोव्हेंबर.. अजूनही पार्सल आलेलं नाही; दिवाळी तर जवळ आली आहे म्हणून मी तो मेल चेक केला, ऑर्डर कुठे पोचली म्हणून ट्रॅक करावं म्हणलं तर त्यामध्ये ट्रॅकिंगची कुठलीही लिंक नव्हती; फक्त पैसे मिळाल्याची रिसीट मला ईमेलने आलेली होती. नशिबाने ऑर्डर केल्यावर मी स्क्रीन शॉट काढून ठेवलेला होता. मग त्याच ईमेल ऍड्रेस वर रिप्लाय करून अजून ऑर्डर मिळाली नसल्याचे कळवले; ही कालची गोष्ट. 24 तासात त्या मेल ला काहीच रिप्लाय नाही. आता माझ्या मनात पाल चुकचुकयला लागली. हे स्कॅम तर नाही? मी मूर्खासारखी फसवली गेली आहे? आणि आता मी बुद्धीने विचार करत होते खरंच ते ड्रेस अडीचशे रुपयाला विकणे शक्य तरी आहे का? एका मोहाला ( हावच म्हणू) आपण बळी पडून मी ते पैसे गमावले होते. मग google वर त्या कस्टमर केअर चा नंबर शोधून तिथे कॉल केला. चार-पाच नंबर मिळाले त्यातले बरेचसे इनकमिंग कॉल ब्लॉक झालेले होते, एकाची रिंग वाजली. पण तो उचलला गेला नाही. थोड्या वेळाने मात्र त्या नंबरने मला कॉल बॅक आला!! मला जरा आश्चर्यच वाटलं आणि आपला आपण स्कॅम आहे असं विचार केलं ते चुकलं की काय, जेन्युईन ऑर्डर आहे की काय, असं वाटलं.. म्हणून मी त्याच्याशी बोलले आणि माझा प्रॉब्लेम त्याला सांगितला. यावर तो म्हणला की मी ही ऑर्डर चेक करतो तुम्ही order confirmed चा स्क्रीन शॉट मला whatsapp वर पाठवा. तसं मी केलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ही ऑर्डर कॅन्सल झालेली आहे आणि तुम्हाला तुमचे पैसे रिफंड मिळतील. खरंतर या ठिकाणी फोन कॉल संपायला हवा, पण तसे न होता तो माणूस मला 'मॅडम कॉल पे रहीये, मॅडम कॉल पे रहीये' असं म्हणायला लागला. मी तुम्हाला लिंक पाठवतो तुम्ही कॉल चालू ठेवा असं तो अनेकदा म्हणायला लागला. यावरून माझी खात्रीच पटली की हा स्कॅम आहे. चौदाशे रुपयांनी यांचं पोट भरलं नाही, ते फक्त यांचा अपेटायझर होतं आणि खरी कमाई तर आता होणार आहे माझ्या जी पे किंवा पेटीएम च्या थ्रू!! मी कॉल चालू ठेवून पेटीएम उघडलं असतं तर त्यातले पैसे यांना काढून घेता येतात. तेव्हा मी सावध होऊन फोन कट केला. आणि तुम्हालाही सावध करायला आले आहे. माझ्यासारखं मूर्ख बनू नका. 1400 रुपये छोटी किंमत नाहीये, त्यासाठी मेहनत ते माझ्या मेहनतीचे पैसे होते, नशिबाने यापेक्षा जास्त गेले नाही. पण ज्या गोष्टी 'Too good to be true' असतात त्यांच्या मोहात पडू नका. 'कुमकुम कुर्ती' 'वाणी कुर्ती' 'मायशॉपीफाय' हे रेड फ्लॅग आहेत. त्यांच्यापासून दूर राहा. instagram वर ज्या लिंक्स/जाहिराती असतात त्या नक्की माहितीच्या असतील तरच तिथून खरेदी करा; किंवा कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरने खरेदी करा. पैसे देण्याची चूक करू नका!!! सावधान!!! इतरांनाही सावधान करा.
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle