भेंडी मसाला (टिफीन रेसिपी)

भरली भेंडी करायला खूप वेळ लागतो म्हणून मी ही त्याच मसाल्याची पटकन होणारी deconstucted भाजी करते. आमच्या घरात टिफीनसाठी एकदम हिट भाजी!

साहित्य:
पाव किलो भेंडी (जरा लहान कोवळी असेल तर मस्तच)
बेसन/भाजणीचे पीठ: तीन - चार टेस्पून
लाल तिखट
धने पावडर
गरम मसाला
आमचूर पावडर एक चमचा, ती नसेल तर अर्धे लिंबू
तीळ आणि दाण्याचं कूट एकेक टेस्पून
मीठ
तेल दोन मोठे चमचे
जिरं, हिंग, हळद फोडणीसाठी
वरून शिवरायला थोडी कोथिंबीर

कृती:

१. भेंडी धुवून, नीट पुसून कोरडी करून घ्या. मग दोन्ही देठ कापून त्या उभ्या चिरा, मोठी लांब भेंडी असेल तर अजून एक आडवा काप द्या.

२. आता कढईत थोडं तेल गरम करून त्यात जिरं, हिंग, हळद फोडणी करा. त्यात भेंडी घालून परता. तेल अश्या हिशोबाने घ्या की सगळ्या भेंडीला नीट तेल लागलं पाहिजे. आमचूर पावडर घाला किंवा अर्ध लिंबू पिळा. सगळं नीट ढवळून घ्या.
img_20231026_195555.jpg

३. भेंडी जरा शिजल्यावर तीळ, बेसन, तिखट, मीठ, दाण्याचं कूट, धने पावडर आणि गरम मसाला घालून सगळ्या भेंडीला कोटिंग होईल असं ढवळून घ्या. (हाच मसाला भेंडीत भरून भरलेली भेंडी करता येईल, पण ते फारच वेळखाऊ होतं. बघू रविवारी!)
img-20240123-wa0006.jpg

४. पाच दहा मिनिटं परतून गॅस बारीक करा आणि दोन मिनिटं झाकण ठेऊन एक वाफ काढा. वर थोडी चिरलेली कोथिंबीर शिवरा.

५. मस्त चमचमीत, कोरडी भाजी सर्व्ह करा, नाहीतर डब्यात भरा. या जेवायला!

img-20240123-wa0004.jpg

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle