भरली भेंडी करायला खूप वेळ लागतो म्हणून मी ही त्याच मसाल्याची पटकन होणारी deconstucted भाजी करते. आमच्या घरात टिफीनसाठी एकदम हिट भाजी!
साहित्य:
पाव किलो भेंडी (जरा लहान कोवळी असेल तर मस्तच)
बेसन/भाजणीचे पीठ: तीन - चार टेस्पून
लाल तिखट
धने पावडर
गरम मसाला
आमचूर पावडर एक चमचा, ती नसेल तर अर्धे लिंबू
तीळ आणि दाण्याचं कूट एकेक टेस्पून
मीठ
तेल दोन मोठे चमचे
जिरं, हिंग, हळद फोडणीसाठी
वरून शिवरायला थोडी कोथिंबीर
माझी पद्धत सांगते. मी (काटेरी वांगी - म्हणजे ती पांढरी आणि जांभळी असतात ना तिच) वांगी उभी चिरुन घेते. म्हणजे मोठी वांगी असतील तर एका वांग्याचे ६ भाग होतात. तसेच बटाटे पण सेम साईझमध्ये कापुन घेते. आता वाटणात १/२वाटी ओलं खोबरं, १ चमचा किंवा आवडीप्रमाणे दाण्याचं कुट, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसुण पाकळ्या, थोडं आलं, धणा-जिरा पावडर असं सगळं अगदी किंचित पाणी घाउन वाटुन घेते.