माझी पद्धत सांगते. मी (काटेरी वांगी - म्हणजे ती पांढरी आणि जांभळी असतात ना तिच) वांगी उभी चिरुन घेते. म्हणजे मोठी वांगी असतील तर एका वांग्याचे ६ भाग होतात. तसेच बटाटे पण सेम साईझमध्ये कापुन घेते. आता वाटणात १/२वाटी ओलं खोबरं, १ चमचा किंवा आवडीप्रमाणे दाण्याचं कुट, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसुण पाकळ्या, थोडं आलं, धणा-जिरा पावडर असं सगळं अगदी किंचित पाणी घाउन वाटुन घेते.
आता कढईत तेल टाकुन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कडीपत्ता, परतुन घेते, मग त्यात हिंग, हळद, लाल मसाला, हवा असल्यास थोडा गरम मसाला, (मी मटण मसाला ट्राय केलेला) हे सगळं टाकुन परतत रहायचं. आता त्यात आपण जे वाटण केलेल आहे ते टाकायचं, ते छान परतलं की मग वांगी आणि बटाटे घालुन पाणी टाकायचं आणि भाजी शिजु द्यायची. आपल्याला जेवडी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं. आणि हो मीठ घालायला विसरु नकोस. भाजी झाल्यावर वरुन छान बारीक चिरलेली कोथिंबीर पण घाल.