दोन - तीन माणसांसाठी, पटकन होणारी, सोपी भाजी!
साहित्य:
एक दुधी भोपळा
अर्धी वाटी मूगडाळ
दोन मोठे चमचे तेल
सहा सात लसूण पाकळ्या, एक उभी चिरलेली मिरची
चमचाभर - हळद, तिखट, गोडा/काळा मसाला, गुळ
चवीनुसार मीठ
एक बारीक चिरलेला टोमॅटो
थोडा खवलेला नारळ,
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१. दुधी धुवून, साल काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. लसूण, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून ठेवा.
२. मूग डाळ पाण्यात भिजवून ठेवा.
३. कढईत तेल तापवून त्यात चिरलेली लसूण आणि मिरची घालून परता, लगेच त्यावर दुधीच्या फोडी परतून झाकण ठेवा. झाकणात पाणी घालून पाच मिनिटे शिजवा.
४. दुधी थोडा शिजला की त्यात मूग डाळ, हळद, तिखट, मसाला घालून ढवळा. त्यात टोमॅटो घालून वर मीठ घालून पुन्हा परतून घ्या.
५. नारळ, कोथिंबीर, गुळ घालून पुन्हा झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवा. शेवटी झाकणातील गरम पाणी भाजीत घालून ढवळा. थोड्या वेळाने गॅस बंद करा.
(ही भाजी कुकरमध्येही दोन शिट्ट्यांमध्ये करता येते. मी कास्ट आयर्न कढई वापरली, त्यात जास्त छान होते.)