ही रेसिपी मी मध्यंतरी इन्स्टावर पाहिली आणि आवडली म्हणून करुनही पाहिली एका गेटूगेदरला. सगळ्यांना आवडली म्हणून शेअर करते आहे.
साहित्य- मेथीची एक जुडी (जितकी माणसं त्याप्रमाणे प्रमाण वर खाली करावं लागेल)
दही, डाळीचं पीठ, लाल तिखट, धने पावडर, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, उभा चिरलेला कांदा, कमी तिखटाच्या लाल सुक्या मिरच्या, मेथी दाणे, जिरं, मोहरी, कढिपत्ता, हिंग, हळद, तेल, तूप, मीठ इत्यादी.
कृती- मेथी धुवून पानं काढून जाडसर चिरुन घ्यायची.
दह्यात डाळीचं पीठ, लाल तिखट, हळद, धण्याची पावडर वगैरे मिक्स करुन पाणी घालून फेटून घेऊन जरा पातळ करायचं.
एका पॅनमध्ये तेल (रेसिपीत मोहरीचं तेल म्हटलं आहे) ठेवून त्यात चिरलेली मेथी परतून घ्यायची. त्यात डाळीच्या पीठाचं मिक्श्चर घालून ढवळून घेऊन उकळी काढायची. दुसर्या कढल्यात तूप गरम करुन त्यात जिरं, मोहरी, मेथीचे दाणे, लाल सुक्या मिरच्या, हिंग, कढिपत्ता वगैरे घालून फोडणी करावी. त्यातच चिरलेला कांदा परतावा. त्यावर आलं, लसूण पेस्ट, त्यावर कसुरी मेथी चुरुन घालावी. आणि ही फोडणी कढीवर घालून पुन्हा उकळी काढावी.
मूळ रेसिपी इथे आहे. शेवटचा फोडणीचा भाग व्हिडीओ बघितल्याच्या आठवणीतून लिहिते आहे. काही मिस झालं असू शकतं.
https://www.instagram.com/reel/C2pTrnLIprh/?igsh=MzY1NDJmNzMyNQ==
Attachment | माप |
---|---|
11f96fa5-b4ff-47b9-8af9-29e1900ac16d.jpeg | 114.68 KB |