ही रेसिपी मी मध्यंतरी इन्स्टावर पाहिली आणि आवडली म्हणून करुनही पाहिली एका गेटूगेदरला. सगळ्यांना आवडली म्हणून शेअर करते आहे.
साहित्य- मेथीची एक जुडी (जितकी माणसं त्याप्रमाणे प्रमाण वर खाली करावं लागेल)
दही, डाळीचं पीठ, लाल तिखट, धने पावडर, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, उभा चिरलेला कांदा, कमी तिखटाच्या लाल सुक्या मिरच्या, मेथी दाणे, जिरं, मोहरी, कढिपत्ता, हिंग, हळद, तेल, तूप, मीठ इत्यादी.
कृती- मेथी धुवून पानं काढून जाडसर चिरुन घ्यायची.
दह्यात डाळीचं पीठ, लाल तिखट, हळद, धण्याची पावडर वगैरे मिक्स करुन पाणी घालून फेटून घेऊन जरा पातळ करायचं.