हा आमचा नाइफ पेन्टींगचा अजून एक प्रयत्न....
माध्यम : अॅक्रलीक कलर
रंग तयार करण्याच काम डायरेक्ट कागदावरच केलं गेलय.... ( आता हा लेकीचा पॅलेट काढायचा आळस आहे की जिनीयसगिरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे )
रपून्झेल अन पास्कल :-)
वन ट्री पेन्टींग
माध्यम : जलरंग
लोणावळ्याच्या रस्त्यावर आम्हाला दिसलेला सुर्यास्त.... जो आम्ही हॉटेलवर पोहचल्या पोहचल्या वहीत उतरवला
माध्यम : कलर पेन्सिल्स
हे ३डी ड्रॉइंगचे काही प्रयत्न.....
समोर गोटी ठेवून हे चित्र काढलय.... हे चित्र पुर्ण होई पर्यंत घरातले सदस्य जणू घरभर माइन्स पेरले आहेत अशा प्रकारात जपून पावल टाकत फिरत होते :ड:
हा आमचा फेव्हरेट घोडा .... ह्याचे बरेच व्हर्जन्स घरातल्या प्रत्येक भिंतीवर... दाराच्या मागे..वहीच्या मागच्या पानांवर पहायला मिळतात :-)
युनिकॉर्न
ही आम्ही काढलेली रांगोळी