' तो ' विठूराया पाठीराखा
' ती ' साथ हवी रुख्माबाईची
सार्यांच्या काळजीचा भार डोई
भक्कम आधारास वीट पायीची ...
गुंतविती भक्तांच्या आणा-भाका
घालूनी गळ्यात तुळशीच्या माळा
जय जऽय राम कृष्ण हऽरी
म्हणत लावती बुक्का कपाळा ...
हिवे गोठता काया,ऊब तव पाया
आसरा देशी पाऊसधारा घेता झेप
कडक उन्हाहून असह्य संसारताप
तुझ्या नामाचा लावू चंदनलेप ...
अलौकिक तेज तव मूर्तीत
लाभले नयनसुख हे पूर्वसंचित
फुले ओवता हात-श्वास सुगंधित
देह पडला काहीवेळ निपचित ...
पांडुरंग...पांडुरंग...
विजया केळकर_____
