(परत एकदा.. जुनंच काहीतरी खरडलेले. बहुधा २००९चे असावे. )
या काही गोष्टी, ज्या मला जमत नाहीत.. किंवा जमवून बघायच्या आहेत!
- कुठेही न धडपडता चालणे.. किंवा स्वयपाक करताना एकही भांडं न पडणे..
- सर्व रस्ते नीट बरोबर नावानिशी लक्षात राहणे.
- कुठल्यातरी मोठ्ठ्या ट्रेकला यशस्वीरित्या जाणे..
- गाडीचे , दाराचे लॉक पहील्या झटक्यात उघडणे. त्यात माझा लेफ्टी असण्याचा ’हात’ असणारे पण!
- एखदं सुंदर वॉटर कलर्स काढायचे आहे. किंवा असं म्हणता येईल, की एखादं वॉटर कलर्स सुंदर काढायचे आहे..
- आयुष्यात एकदातरी लोकांसमोर गाणं चांगलं गाऊन दाखवायचे आहे! नाहीच्च जमत!
- केक वगैरे बेकिंगचे पदार्थ मस्त फ्लफी वगैरे करून दाखवायचेत.
- घरात एक मोठी रूम पूर्ण लायब्ररी करायची आहे आणि त्यात संध्याकाळी किमान दोन तास वाचत बसायचे आहे!
- हो! परवाच लक्षात आलं.. ब्लॉगवर एक कथा लिहायची आहे.. प्रॉपर भरपूर संवाद, सस्पेन्स, इमोशन्स वगैरे वाली!
- गिटार आणि सिन्थेसायझर नीट शिकायचाय! सिन्थ ४-५ वर्षं शिकले.. गिटार नाहीच..
- भरपूर स्विमिंग करायचे आहे.. सर्व स्ट्रोक्स स्पेशली बटरफ्लाय! ..
- बॅडमिंटन कन्टिन्यु करायचे आहे.. टेनिस शिकायचे आहे..
- जॅपनिज, जर्मन अथवा फ्रेंच शिकायची आहे..
- साल्सा किंवा लॅटीन डान्स शिकायचा आहे!
- इजिप्त,हवाई आणि बाली बेटं तसेच नॉर्दर्न लाईट्स किंवा aurora borealis इत्यादी ठिकाणं पाहायची आहेत..
- नॉर्दर्न लाईट्स वरून आठवले, मीना प्रभूंसारखा मनसोक्त जगभर प्रवास करायचाय! नाही, मी पुस्तकं नाही लिहीणार!
- आत्ताच नाही, पण काही काळाने परत आणि भरपूर शिकायचे आहे! आणि पहील्या नंबरानेच पास व्हायचेय!
- कुंभार काम करायचेय.. मातीची भांडी,कप्स,बोल्स इत्यादी इत्यादी! (मिंट्स हे असे वाटण्यात तुझ्या लेखाचा व कलाकृतींचा हात आहे..)
- Paragliding, Parasailing, Snorkeling आणि Bungee Jumping.. (last one seems really difficult!)
- ..... अजुन खूप काही!
तुमच्या काय आहेत विश लिस्ट?