मुळा: ए बटाट्या, बघ मी तुझ्यापेक्षा किती गोरा!
बटाटा: मी यम्मी!
मुळा: तू यमी? म्हणजे मी यमीपेक्षा दुप्पट गोरा!
बटाटा: फालतू जोक मारु नगंस! यम्मी म्हंजे टेश्टी. तुज्यापेक्षा मी जास्त लाडका. तुज्या वासानंच लोक पळून जात्यात. त्या बाया परवा केक बनवत होत्या, तुला घातला का कुणी त्यात? गाजराला घाला, फळं घाला म्हनल्या त्या स्नेहश्री बाई.
मुळा: तुला तरी घालतंय का कुणी केकमध्ये?
बटाटा: घालत्यात ना! त्याला 'पॅन'केक म्हणत्यात. 'लाडके!' ज्यू लोकांचा पदार्थ आहे. त्या बीनाताई सांगतील. आणि ऑल ह्यूमन्स आर मेड इक्वल, नॉट बटाटाज.. कळलं? माजे अमेरिकेतले भाऊ लाल-जांभळे हायेत.
मुळा: ऑं? :surprise:
बटाटा: व्हय. आता त्या बाया म्हणतायत "रंग खेळू चला". तू जा, कुणी रंगीत भाऊबंद गावतोय का बघ, त्याला घेतील खेळात!
मुळा: मग आपल्याला घेणार नाहीत म्हणतोस..
बटाटा: बघू आता, कोण आसंल मायाळू त्या मामीवाणी तर घेतील. तिनं टाकल्यात ते मश्रूम का काय त्याचं फोटू. त्याला ना धड रंग ना रुप! अंगभूssत रंगाचा खेळ हाय म्हणत्यात. बघू घेतायत का..
मुळा: कधी कळणार मग आपल्याला? :waiting:
बटाटा: कळंल, कळंल. सांगतील उद्या-परवा.
----------------------------------
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle