मुळा: ए बटाट्या, बघ मी तुझ्यापेक्षा किती गोरा! बटाटा: मी यम्मी! मुळा: तू यमी? म्हणजे मी यमीपेक्षा दुप्पट गोरा! बटाटा: फालतू जोक मारु नगंस! यम्मी म्हंजे टेश्टी. तुज्यापेक्षा मी जास्त लाडका. तुज्या वासानंच लोक पळून जात्यात. त्या बाया परवा केक बनवत होत्या, तुला घातला का कुणी त्यात? गाजराला घाला, फळं घाला म्हनल्या त्या स्नेहश्री बाई. मुळा: तुला तरी घालतंय का कुणी केकमध्ये?