रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- डच पीज सूप

हा ऊपक्रम जाहीर झाला तेव्हा मी यात भाग घेऊन लिखाण करु शकेन अस स्वप्नातही वाटलं नव्हतं. :P लेख , ललित पाडलं असल तरी या विभागात कधी पाऊल टाकल नव्ह्तं ( थॅन्क्स टू जालावरील पाकृ चर्चा Lol ) पण काल सहज मोबाईलमधली गॅलरी बघताना दीपालीकडून घेतलेल्या काही रेसिपिज सापडल्या. ही रेसिपी नियमात बसणारी वाटली. मग म्हणल थोडफार चुकल तरी इथल्या बस्कु अ‍ॅन्ड तायाज टीम काही आरडाओरडा करणार नाहीत . :winking: तर जोर लगाके हैशा करत सादर आहे डच पीज सूप रेसिपी !! Praying

साहित्य
१) एक बाऊल मटारचे दाणे. ( मी अर्धा बाऊलच घेतला आहे कारण घरी मी आणि मावशीच सूप पिणारे )
२) १ कांदा - फोडी करुन
३) थोडी कोथिंबीर
४) १ छोटा बटाटा ( साल काढून ) - फोडी करुन
५) १ बाऊल मटारच्या हिरव्यागार साली *
६) चवीपुरत मीठ **
७) पुदिना

2016-03-20-22-18-41.jpg

तर आता कृती

मटारचे दाणे , कांदा , बटाटा व मटारच्या साली कुकरला शिजवून घ्या. शिजल्यानंतर ह्या मिश्रणात कोथिंबिर आणि पुदिन्यातली थोडी पान मिक्स करुन मिक्सरमधे वाटून घ्या. तयार झालेल्या मिश्रणात गरजेपुरते पाणी व चवीपुरत मीठ घाला. गाळून घेऊन एक ऊकळी आणून उरलेल्या पुदिन्याच्या पानानी सजवा. गरम सर्व्ह करा .

2016-03-20-22-15-56.jpg

हुश्श .. झाल एकदाच.

अधिक टिपा.
* मूळ रेसिपित मटारच्या साली वाचून दचकायलाच झालेलं. आणि करायचीही माझी पहिलीच वेळ . त्यामुळे घाबरत घाबरत फक्त दोनच सालींचे तुकडे घातले. मूळ रेसिपित ह्या साली घालायच कारण विशेष चांगली चव येते अस दिल आहे.

** फोटोत मीठ दिसत नाही कारण पटापट करण्याच्या नादात मीठ घालाय्च विसरले होते. फायनल प्रॉडक्ट्च्या वेळि घातलेल आहे.

आता मार्किन्ग गेम.

१) दिलेल्या रंगाचे भाजी / फळ वापरले - १ मार्क
२) तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी फळाचा जो होता तोच आहे काय - होय, हिरवा आहे. - २ मार्क
३) फोटो दिलाय - १ मार्क
४) पारंपारिक विथ ट्विस्ट - मे बी . जालावर शोध घेतल्या असता ह्या सूपच चिकन , हॅम वगैरे घालून केलेल व्हर्जन सापडतं - मी आपल शाकाहारी घटक तेवढ घेतले - २ मार्क
५) कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क्स

टोटल मार्क्स - ८ मार्क्स

Recipe Nutrition Calculator
Recipe name
Number of servings
Serves people
Ingredients Calories Carbs Fat Protein Sodium Sugar
Peas, green, cooked, boiled, drained, without salt, 1 cup 134 25 0 9 5 9 Ico_delete
Potato - Potato Boiled, 0.5 cup 67 16 0 2 188 1 Ico_delete
Cooked Onion - Onion, 29 g 19 2 1 1 40 1 Ico_delete
Generic - Mint Leaf, 2 leaves 0 0 0 0 0 0 Ico_delete
Add Ingredient
Total: 220 43 1 12 233 11
Per Serving: 110 22 1 6 117 6

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle