२ हिरवी सफरचंदे (ते ग्रॅनी स्मिथ वगैरे हिकडे मिळत नाही त्यामुळे काय कळत नाही.) बाजारात एकच प्रकारची ठेवलेली असतात. ती उचलून घेऊन यायची. आंबट नसतील तर खायची नायतर लोणचे करून टाकायचे असा साध खाक्या आहे). तर हिरव्या स.चं च्या (फारच बुवा मराठी नाव मोठे) फोडी करून घ्यायच्या हव्या तशा.
केप्र/काटदरे/प्रवीण/बेडेकर चा तयार कैरी लोणचे मसाला(आपली, आपल्या मातेची लॉयल्टी कोणावर असेल त्या प्रमाणे). हा पण आपल्या तिखट खायच्या वकुबाप्रमाणे.
१/२ चमचा काश्मिरी लाल तिखट (हे स. चं चा मू़ळ हिरवा रंग राहून न द्यायचे काम करते.)
मीठ चवीप्रमाणे
गूळ हवा असल्यास. घालून आणि न घालता दोन्ही बरे लागते.
या खेळा साठी हिरवा रंग दिला तेव्हा मला अतिशय आनंद झाला. कितीतरी दिवसांपासुन करायची असलेली स्मुदी करायला मिळणार म्हणुन.
साहित्यः
सेलेरी
ग्रीन अॅपल (आवडीनुसार. मी एक घेतले)
अर्धी काकडी
मुठभर पालक
१ ग्लास नारळाचे पाणी (आमचा नारळ अदभुत निघाला, त्यातुन गुलाबी रंगाचे पाणी निघाले :devil: )
१ चमचा प्रोटीन पावडर
१/४ हिरवे लिंबु
एक चमचा चिया सीड्स भिजवलेल्या
कृती:
काकडी, सेलेरी आणि अॅपलच्या फोडी करुन घेतल्या. सगळे साहित्य एकत्र करुन ब्लेंडरमधे एकत्र केले. मूळ रेसिपित लिंबुसालासकट टाकायचा होता पण माझ्याकडचा लिंबु ताजा नव्हता म्हणुन मी रस फक्त घेतला.
हा ऊपक्रम जाहीर झाला तेव्हा मी यात भाग घेऊन लिखाण करु शकेन अस स्वप्नातही वाटलं नव्हतं. :P लेख , ललित पाडलं असल तरी या विभागात कधी पाऊल टाकल नव्ह्तं ( थॅन्क्स टू जालावरील पाकृ चर्चा ) पण काल सहज मोबाईलमधली गॅलरी बघताना दीपालीकडून घेतलेल्या काही रेसिपिज सापडल्या. ही रेसिपी नियमात बसणारी वाटली. मग म्हणल थोडफार चुकल तरी इथल्या बस्कु अॅन्ड तायाज टीम काही आरडाओरडा करणार नाहीत . :winking: तर जोर लगाके हैशा करत सादर आहे डच पीज सूप रेसिपी !!
साहित्य
१) एक बाऊल मटारचे दाणे. ( मी अर्धा बाऊलच घेतला आहे कारण घरी मी आणि मावशीच सूप पिणारे )
२) १ कांदा - फोडी करुन