या खेळा साठी हिरवा रंग दिला तेव्हा मला अतिशय आनंद झाला. कितीतरी दिवसांपासुन करायची असलेली स्मुदी करायला मिळणार म्हणुन.
साहित्यः
सेलेरी
ग्रीन अॅपल (आवडीनुसार. मी एक घेतले)
अर्धी काकडी
मुठभर पालक
१ ग्लास नारळाचे पाणी (आमचा नारळ अदभुत निघाला, त्यातुन गुलाबी रंगाचे पाणी निघाले :devil: )
१ चमचा प्रोटीन पावडर
१/४ हिरवे लिंबु
एक चमचा चिया सीड्स भिजवलेल्या
कृती:
काकडी, सेलेरी आणि अॅपलच्या फोडी करुन घेतल्या. सगळे साहित्य एकत्र करुन ब्लेंडरमधे एकत्र केले. मूळ रेसिपित लिंबुसालासकट टाकायचा होता पण माझ्याकडचा लिंबु ताजा नव्हता म्हणुन मी रस फक्त घेतला.