रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- ग्रीन स्मुदी

या खेळा साठी हिरवा रंग दिला तेव्हा मला अतिशय आनंद झाला. कितीतरी दिवसांपासुन करायची असलेली स्मुदी करायला मिळणार म्हणुन.

साहित्यः
सेलेरी
ग्रीन अ‍ॅपल (आवडीनुसार. मी एक घेतले)
अर्धी काकडी
मुठभर पालक
१ ग्लास नारळाचे पाणी (आमचा नारळ अदभुत निघाला, त्यातुन गुलाबी रंगाचे पाणी निघाले :devil: )
१ चमचा प्रोटीन पावडर
१/४ हिरवे लिंबु
एक चमचा चिया सीड्स भिजवलेल्या

कृती:
काकडी, सेलेरी आणि अ‍ॅपलच्या फोडी करुन घेतल्या. सगळे साहित्य एकत्र करुन ब्लेंडरमधे एकत्र केले. मूळ रेसिपित लिंबुसालासकट टाकायचा होता पण माझ्याकडचा लिंबु ताजा नव्हता म्हणुन मी रस फक्त घेतला.

मार्कः
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक विथ ट्विस्ट? ही स्मुदी पाहिली होती आधी पण त्यात मी बरेच बदल केले सो २ मार्क
५. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle