रंग खेळू चला - ईट युअर कलर्स- वसंताची मोहिता(तो)

काल घरात हिरवी सफरचंद, हिरवं किवी, हिरवी काकडी, अव्हाकाडो असे बरेच थीमला साजेसे हिरवे प्रकार होते.
पण लोलानी मोहिता ची रेसिपी टाकल्यावर मला मोहितोची रेसिपी टाकायचा मोह अनावर झाला :P
त्यातुन काल वसंत ऋतुचं ऑफिशिअली आगमन झाल्यामुळे त्याच्या म्हणजे वसंताच्या स्वागता प्रित्यर्थ ही मोहिता :ड

घटक पदार्थ आणि रेसिपीचा साधारण अंदाज होताच पण तरी एकदा गुगलबाबा कडून खात्री करुन घेतली.

साहित्य-
१) हिरवं किवी - १ - चिरुन
२) लिंबाचा रस - एक ते दिड चमचा
३) पुदिन्याची पानं - ५-६
४) साखर - २ चमचे
५) रम - ३ ते ४ चमचे
६) सोडा
७) बर्फ

कृती-
घटक १) ते ४) एकत्र करुन मिक्सर मधून फिरवा. (मी स्मूदी मिक्सर वापरला).
त्यात आवडीप्रमाणे रम आणि बर्फ घालुन पुन्हा एकदा मिक्स करा.
ग्लास मधे बर्फ आणि सोडा घालून त्यावर हे मिश्रण ओता.
किवीचा तुकडा आणि पुदिन्याच्या पानाची सजावट करा.

१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क
५. कॅलरी तक्ता पुरवला - नो वे!  68 :ड
टोटल - ६

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle