काल घरात हिरवी सफरचंद, हिरवं किवी, हिरवी काकडी, अव्हाकाडो असे बरेच थीमला साजेसे हिरवे प्रकार होते.
पण लोलानी मोहिता ची रेसिपी टाकल्यावर मला मोहितोची रेसिपी टाकायचा मोह अनावर झाला :P
त्यातुन काल वसंत ऋतुचं ऑफिशिअली आगमन झाल्यामुळे त्याच्या म्हणजे वसंताच्या स्वागता प्रित्यर्थ ही मोहिता :ड
घटक पदार्थ आणि रेसिपीचा साधारण अंदाज होताच पण तरी एकदा गुगलबाबा कडून खात्री करुन घेतली.
साहित्य-
१) हिरवं किवी - १ - चिरुन
२) लिंबाचा रस - एक ते दिड चमचा
३) पुदिन्याची पानं - ५-६
४) साखर - २ चमचे
५) रम - ३ ते ४ चमचे
६) सोडा
७) बर्फ
"पुलिंतांपामि" नक्की इथल्या अनेकजणींना हा माझा टायपोच वाटला असणार
तरीही अवलची व्होकॅबलरी माहिती असलेल्या गोंधळात नक्की पडल्या असतील ना? नक्की काय बरं लिहायचं होतं हिला :thinking:
पण काये न लोलाच्या श्टाईलच्या उपक्रमाला थोडं तरी जागलं पाहिजे न? :ड
तर झालं असं की आज लेकाला बिर्याणी खायची हुक्की आली. मग स्वाभाविकच मला सामीची आठवण आली. मग काय घातला बिर्याणीचा घाट :fadfad:
तर तांदूळ घाटत असताना मला लोलाची आठवण आली. मग म्हटलं घालून टाकू "ईट आपलं ड्रिंक, युवर कलर्स"चाही घाट
मग ओट्यावरच्या वस्तू दिसू लागल्या :waiting: