मु: त्वरा करा! शेवटचे दोनच आठवडे!
ब. आठवडाभर नुस्ता आराम केलाय, आता करा लगबगीनं.. :waiting:
मु: आराम नाही, केलेत रे ते सपाट पाव की काय. पण कोणाला रेसिपी, फोटो टाकायला वेळ झालेला नाही!
ब: तुला काय म्हाईत?!
मु: मला माहिताय, बघ आता येतील रेसिप्या, आणि अजून एप्रिल एन्डपर्यंत वेळ आहे की!
बः बर, मग आता आपण लवकरच गाशा गुंडाळू, फार पकवाया नको!
मु: अरे पण ते शेवटच्या दोन आठवड्यांचं काय ते सांग की!
बः काय नाही नुसती उलटापालट!
मु: म्हणजे?
बः म्हंजे असं बघ.. आधी हिरव्या रंगाचं पेय केलं ना? आणि लाल चट्ण्या, कोशिंबीरी, लोणची?
मु. हां
बः मग आता उलट करायचं!
"पुलिंतांपामि" नक्की इथल्या अनेकजणींना हा माझा टायपोच वाटला असणार
तरीही अवलची व्होकॅबलरी माहिती असलेल्या गोंधळात नक्की पडल्या असतील ना? नक्की काय बरं लिहायचं होतं हिला :thinking:
पण काये न लोलाच्या श्टाईलच्या उपक्रमाला थोडं तरी जागलं पाहिजे न? :ड
तर झालं असं की आज लेकाला बिर्याणी खायची हुक्की आली. मग स्वाभाविकच मला सामीची आठवण आली. मग काय घातला बिर्याणीचा घाट :fadfad:
तर तांदूळ घाटत असताना मला लोलाची आठवण आली. मग म्हटलं घालून टाकू "ईट आपलं ड्रिंक, युवर कलर्स"चाही घाट
मग ओट्यावरच्या वस्तू दिसू लागल्या :waiting:
बटाटा: तर मुळ्या, तू वाचलंस ना? मुळा: काय? बटाटा: तुझे रंगीत भाऊबंद आहेत म्हणे.. लाल, गुलाबी. प्राची, नंदिनी, मोनाली सांगत होत्या. मुळा: बsssरं, मग? बटाटा: मग काय? बोलव की त्यास्नी, रंग खेळाया! मुळा: अरे, पण अजून काय माहिती नाही, कशाचा पत्ता नाही आणि काय खेळतोस! बटाटा: हाय ना, हा बघ मी आणलाय घोषणेचा कागूद, तुला वाचून दावतो. लक्ष दे नीट, काय? मुळा: हां, बोला. बटाटा: "रंग खाऊ चला!"