मुळा: या! काय बातमी आणलीत?
बटाटा: नवा रंग, नवा खेळ!
मुळा: अरे देवा! काय पेयं, काय पिळून काढलं सगळ्यांना. बरं झालं आपण नव्हतो! बरं, मुद्द्याचं सांगा, फार बडबड नको.
--------------
बटाटा:
आठवडा -२
रंग - लाल, लाssलेलाल
पदार्थ - चटणी, लोणचे, कोशिंबीर!
नियम- तेच
मार्किन्ग सिस्टीम - तीच
मुळा: तेच आणि तीच नको, पुन्हा सांगा नीट!
-------------
नियम-१- लाल रंगाची फळे किंवा भाज्या घ्यायच्या. त्यांचा जो भाग पदार्थात वापरणार तो लाल रंगाचा असला पाहिजे. एक किंवा अनेक भाज्या/फळं चालतील. त्यासोबत अजून काहीही वापरु शकता.
नियम-२- त्या भाजी किंवा फळाचा खाण्याचा पदार्थ बनवायचा.
नियम-३- त्याचा फोटो काढायचा.
नियम-४- त्या पदार्थाची कृती लिहायची.
नियम-५- फोटो आणि कृती "मैत्रीण" वर "सृजनाच्या वाटा" मध्ये पोस्ट करायची.
नियम-६-(कडक) कृत्रिम रंग वापरायचा नाही!
------------------
मार्किन्ग शिश्टीम.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क, वेगळा आहे- १ मार्क.
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक रेसिपी - १ मार्क, पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क, नवीन ओरिजनल - ३ मार्क
५. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क. इथला कॅलक्युलेटर वापरु शकता- http://www.myfitnesspal.com/recipe/calculator
६. कृत्रिम रंगाचा उपयोग- नापास.
८. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले नाही - नापास
९. सांगितलं एक आणि केलं भलतंच - नापास
१०. रेसिपीचे मार्क्स स्वतःच कॅलक्युलेट करुन लिहायचे.
-----------
बटाटा: लक्षात ठ्येवा, ध्यानात ठ्येवा, मनात ठ्येवा!
आठवडा: २, रंगः लाल, पदार्थ - चटणी, लोणचं, कोशिंबीर!
चटणी लालेलाल यांचे लोणचे लालेलाssल
सॅलड लालेलाल यांची पचडी लालेलाssल