याचं रेसिपीचं नाव फ्रूरूssट सॅलड, कारण यात एक फ्रूट आणि एक रूट आहे. कलिंगड आणि लाल मुळा असं अजब काँबिनेशन असलेलं हे सॅलड तुम्हाला आवडेल अशी आशा. चांगलं लालेलाल आणि गोड कलिंगड आणायचं! आणि ताजे छोटे छोटे मुळे, पानांसकट जुडी मिळते.
साहित्य:
कलिंगडाचे तुकडे - २ कप
छोटे मुळे - २ , पातळ गोल स्लाइस कापून किंवा चौकोनी तुकडे करुन,
हिमालयन पिन्क सॉल्ट किंवा सी सॉल्ट किंवा साधं मीठ
पुदिना किंवा कोथिंबीर सजावटीसाठी
ड्रेसिंगसाठी-
१ टेबलस्पून आल्याचा रस किंवा १/२ टेबलस्पून किसलेले आले.
१ टेबलस्पून लिंबाचा रस
१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल
मुळा: या! काय बातमी आणलीत?
बटाटा: नवा रंग, नवा खेळ!
मुळा: अरे देवा! काय पेयं, काय पिळून काढलं सगळ्यांना. बरं झालं आपण नव्हतो! बरं, मुद्द्याचं सांगा, फार बडबड नको.
-------------- बटाटा: आठवडा -२ रंग - लाल, लाssलेलाल पदार्थ - चटणी, लोणचे, कोशिंबीर! नियम- तेच
मार्किन्ग सिस्टीम - तीच मुळा: तेच आणि तीच नको, पुन्हा सांगा नीट!
-------------