चला रंग खेळूया
लाल !
हैला मी चक्क माझ्या नावडत्या विषयाचा पेपर लिहितेय.
नावडता असल्यानी मी लौकरात लवकर बनणारं अन कमी कष्टात जास्तीत जास्त फूटेज ( कमी क्यालरीज म्हणा ) मिळणार , आमच गाजर बहार दिलखूष लोणच आणालय इथे.
साहित्य,
गाजरं - लाल गाजरच घ्यायची , केशरी नाहीत. ४-५
लाल तिखट- माझ्या घरी मस्त झणझणीत रंगाची पण अजिबात तिखट नसणारी ब्याडगी मिरचीची पूड असते. ( हे पण लालच आहे )
लिंबाचा रस- १ मोठ् रसदार लिंबू.
चवीप्रमाणे मिठ.
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग.
कृती-
गाजराचे बारीक तुकडे करून घ्यायचे ( ५ मीमी *५ मिमि*४मिमि , हा बेन्च मार्क. हाताशी असलेला वेळ , मदतिला असलेली माणास , त्यांच कौशल्य ह्यानुसार बदल करू शकता) :ड
त्यात आता लाल तिखट( झेपेल तितक) , मिठ घालून पंधरा मिनीट झाकून ठेवायच.
लिंबू पिळायच
फोडणीसाठी तेल तापत ठेवायच , तेल तापल्यावर मोहरी , ती तडतडल्यावर हिंग अन करपायच्या आत गॅस बंद करून फोडणी घालायची मिश्रणावर.
झाल गाजर बहार लोणच तयार!
वाढणी
आमच्यात भाजी सारख घेउन खातात.
फोटू
हा इथे देण्यासाठी काढला नव्हता. बरा फोटो उद्या काढून डकवीन. ( तेवढ्यासाठी मार्क कापायला नकोत )
मार्किन्ग शिश्टीम.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क,
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक रेसिपी - नवीन ओरिजनल - ३ मार्क ( पारंपारीक कधी निगुतीनी शिकलेच नाहीये सो सगळ वर्जिनलच
५. कॅलरी तक्ता पुरवला - हे नाही केलय.
६. कृत्रिम रंगाचा उपयोग- नो नाय नेव्हर
पासिंग कितीला आहे! :ड