अमेरिकेत कुत्रे पाळताना ...

अमेरिकेत कुत्रे पाळणे यावर थोडी माहिती लिहावी असे वाटत होतेच. दरम्यान अनुश्रीने विचारल्यानुसार इथे काही मुख्य पॉईंट्स लिहितेय.ही प्रचंड प्राथमीक यादी आहे. आणि मी ती हळू हळू विस्तारत नेणार आहे. कारण सगळे एकदम पर्फेक्ट करून लिहू म्हणाले तर वर्ष लागेल सगळे लिहायला. समथिंग इस बेटर दॅन नथिंग :)

सर्वात प्रथम अपार्टमेंट मध्ये रहात असल्यास कुत्रे अलाऊड आहे का हे पहिल्यांदा विचारून घेणे. त्यात कुठल्या ब्रीडना रिस्त्रिक्षन आहेत का ते पण विचारुन घेणे.
घरातले लहान मूल जर कुत्रा पाळूयात मी सगळे करेन असे म्हणात असेल तरी ते मूल काहीही करणार नाही हे गृहित धरुन आपल्या सगळ्या लाईफस्ताईलम्धे कुत्रे फिट होते का ते पहाणे. घरात अजिबात घाण झालेली खपत नाही, घरातल्या फर्निचर्/सामानावर प्रचंड जीव आहे, चरा पडला तरी रात्र रात्र झोप लागत नाही असे असेल तर कुत्रे पाळणे तुमच्या लाईफस्टाईलमधे बसत नाही असे समजावे. घरातल्या सगळ्या सदस्यांना कुत्र्याची आवड असावी, तिरस्कार असु नये. It should be a family pet not an individual's pet.

कुत्रे पाळणे म्हणजे कायमचे लहान मूल असण्याजोगे आहे. त्याचे खाणे/पिणे/चालणे/व्यायाम वेळच्यावेळी झालाच पाहीजे, तुम्ही उपाशी असलात तरी.
सतत फिरतीची नोकरी, सतत गावाला जाण्याची आवड असेल तर घरात कुत्रे असणे जाचक वाटू शकते. या सगळ्याचा विचार कुत्रे घरी आणायच्या आधी करावा. आणल्यावर परत देणे म्हणजे त्या मूक प्राण्यावर अन्याय आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

हा सगळा विचार करुन झाला आणि कुत्रे घरी आणायचे असे ठरवले तर आपल्यासाठी कोणते ब्रीड जास्त सुटेबल होईल याचा विचार करावा. http://www.akc.org/ या साईटवर सगळ्या ब्रीडची माहिती असते. ते सगळे वाचून काढावे. फॅमिली डॉगमधे लॅब्राडोर, गोल्डन रिट्रिवर, जर्मन शेफर्ड, पूडल वगैरे बरेच पर्याय आहे. पण अगदी ब्रीडनुसार कुत्रे घेतले म्हणजे तसेच वागेल असे नसते. बेस्ट केस सिनारियो, वर्स्ट केस सिनारोयो असू शकतात. त्यामुळे माहीती फक्त गाईडलाईन म्हणुन वापरावी. मिक्स ब्रीड्स आर अ डिफरण्ट बॉल गेम :) कारण कुठले ट्रेट कुठे दिसतील सांगता येत नाही. पण त्यात काहीही वाईट नाही त्यामुळे मिक्स ब्रीड घ्यायला हरकत नाही. लहान कुत्रे बरीच भुंकणारी / यापी असतात हे ल्क्षात ठेवावे :)

आता हे सगळे वाचुन कुत्रे आणायचे ठरवले तर खालील पर्याय असतात -

  • ब्रीडरकडून पिल्लू विकत घेणे
  • शेल्टर कडुन पिल्लू आणणे
  • शेल्टरकडून १-२ वर्षाचे कुत्रे आणणे
  • स्पेसिफिक ब्रीडच्या रेस्क्यु ऑर्गनायझेशन कडून कुत्रे अ‍ॅडॉप्ट करणे

या प्रत्येक पर्यायावर एक मोठा लेख होऊ शकतो. पण मी सल्ला देईन की शक्यतो आपल्याला हवा आहे तो कुत्रा शेल्टरमधे आहे का पहा, किंवा त्या कुत्र्यांच्या रेस्क्यु ऑर्ग कडून कुत्रे अ‍ॅडॉप्ट करा. ब्रीडर कडून शक्यतो नको, आणि तसेच करायचे असले तर प्लिज प्लिज रिस्पॉन्सिबल ब्रीडर कडून घ्या.

कुत्रे/पिल्लू घरी आले, पुढे काय? साधारण वेळापत्रक खाली देते आहे, इतर काही लिस्ट पण दिल्यात. हे सगळे डिटेलम्धे लिहायचे तर प्रत्येक भाग प्रचंड मोठ्या आवाक्याचा आहे. ज्याबद्दल माहिती हवी आहे ते विचारल्यार नीट डिटेलमधे उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.

कुत्र्याचे पिल्लू लहान असताना -

  • दर २-४ तासाने शी/शू ला बाहेर नेणे, हे साधारण कुत्रे १ वर्षाचे होईपर्यंत, नंतर साधारण ६-८ तास होल्ड करतात काही ब्रीड जास्ती पण करतात
  • घरात काहीही लाकडाचे वगैरे सामान असेल तर कुरतडणे वगैरे करू शकतात ते न होण्यासाठी नियमित नाही म्हणुन सांगणे, ट्रेनिंग देणे
  • कोणत्याही प्रकारचा अब्युज - मारणे, शिक्षा देणे, उलटे पकडणे, जेवण न देणे वगैरे न करणे
  • कुत्रे घेतले म्हणजे ती एक बाळासारखी जबाबदारी आहे, ती आपली आहे आणि त्यात हयगय होणार नाही हे सतत पहाणे
  • डॉक्टरकडे नेणे, वेळच्यावेळी सगळ्या लसी, औषधे देणे
  • इंशुरंस घेणारे का ते ठरवून नित अंमलबजावणी करणे
  • ट्रेनिंगला नेणे, practice करवून घेणे

रोजचे वेळापत्रक -

  • सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी ३०-४० मिनिटे व्यायाम (थंडी/ वारा/ पाऊस काहीही असले तरी)
  • सकाळी आणि संध्याकाळी नियमित जेवण आणि पाणी देणे
  • ट्रेनिंगला नेणे, घरी ट्रेनिंगचे reinforcement
  • कुत्र्याची शी उचलून आणणे/गार्बेज मध्ये टाकणे
  • घरच्यांनी सहमतीने सगळे नियम पाळणे, एकाने एक दुसर्याने दुसरे असे केल्यास डोक्यावर बसतात
  • रात्री झोपायाच्या आधी कुत्र्याला बाहेर नेऊन शू/शी करवून आणणे

इतर महत्वाच्या गोष्टी -

  • कुत्र्याचे spay / Neutering करुन घेणे
  • मायक्रोचिप घालून घेणे
  • सिटीकडे कुत्र्याचे रजिस्ट्रेशन करणे

Training -

  • Crate training
  • No whining, no growling
  • Pee-Poop on demand
  • Sit, stay, down, come
  • Not eating until told to eat
  • No growling if someone picking up bowl while the dog is eating (no food agression)
  • No jumping
  • No chewing

Issues -

  • Separation Anxiety
  • Food agression
  • House training

लीश (दोरी)वर चालवणे -
लीशवर भुभुने नीट चालावे यासाठी प्रयत्न्पूर्वक झटावे लागते. नाही तर माणूस कुत्र्याला चालवत नसून कुत्रे माणसाला चालवतेय असे दृष्य दिसते. आणि यात लॅब्स, गोल्डन्स, शेफर्ड्स असे मोठे ब्रीड्स सगळ्यात महत्वाचे. भूभुला आपल्या डाव्या साईडला चालायची सवय करायची. त्यासाठी 'हील' पोझिशनची सवय करायची. रिट्रॅकेबल लीश वापरायची नाही. जरा नज केले की कुत्र्याला आपण जे करतोय ते बरोबर नाही हा सिग्नअल देणे महत्वाचे असते.
१००% कुत्र्यांना रस्त्यावर हुंगत जायची सवय असते. आणि ते तसे १०-१५ मिनीटेपण हुंगू शकतात. अशावेळी नाव घेउन वॉक असे म्हणाले की त्याने न ओढता तुमच्या सोबत यायचे ट्रेनिंग द्यायला हवे. त्यासाठी मधुन मधुन भुभुचे नाव घ्यायचे म्हआण्जे तो/ती आपल्या नजरेकडे पहातो याला 'गुड डॉग' असे म्हणुन अ‍ॅक्नॉलेज करायचे.

काय टाळावे -

  • समजा भुभुने एखादी चूक केली जसे लाकडाचे फर्निचर चावले वगैरे तरी ते करताना पकडले तरच त्यांना चुक कळते. नंतर तासाने आरडाओरडा करुन त्यांना असोसिएट करता येत नाही.
  • भुभुला आपल्या जवळ बोलावून शिक्षा करु नये. म्हणजे काही चूक केलिय तर भुभु कम असे म्हणाल्यावर ते जवळ येते तेव्हा शिक्षा करु नये कारण तसे २-३ वेळा जरी केले तरी त्याला जवळ बोलवणे = शिक्षा असे असोसिएशन होते. भुभुने 'कम' किंवा 'हिअर' म्हणल्यावर आपल्याजवळ प्रेमाने येणे अपेक्षीत असते.
  • भुभु एखादेवेळी पडले, स्लीप झाले, धडकले तर 'अरे अरे अरे माझं सोनं गं ते...' वगैरे वगैरे करुन कुरवाळू नये. कारण ते बिचकायला लागतात. समजा बाहेर पडता पडता दरवाजावर आपटले, तर सरळ १०-१२ पावले पुढे जावे ऑब्सर्व्ह करावे पण टच करु नये. साधारण ३-४ मिनीटे गेल्यावर मग टच करुन चेच्क करावे. अर्थात लाईफ थ्रेटनिंग असेल तर लगेच पहायलाच पाहिजे.

कॉलर्स -

आम्ही ट्रेनिंंगसाठी Gentle Leader किंवा no slip collar वापरतो.
मी स्वतः पर्सनली प्रॉन्ग कॉलर वापरायच्या विरोधात आहे. मला ते खुप इन्ह्युमेन वाटते. त्यामुळे आमच्या कोणत्याच फॉस्टरनादेखील आम्ही ते वापरत नाही.

क्रेट ट्रेनिंग -
एकदा का त्यांनी हे माझे घर असे अ‍ॅक्सेप्ट केले की ते त्या घरात कधीही शु-शी करत नाहीत, पण कधेकधी अ‍ॅक्सिडेंट होऊ शकतात ते वेगळे. सुरुवातीला हा ट्रेनिंगचा महत्वाचा भागही असतो.
भुभु साठी क्रेट ही एक सेफ जागा वाटली पाहिजे. म्हणजे क्रेटमधे भुभुला कोणत्याही प्रकारे शिक्षा करु नये, क्रेटमधुन कधीही ओढुन काढु नये. त्याइअवजी बोलावले की येणे असे ट्रेनिंग द्यावे. स्पेशली लहान मुलांना (घरच्या. पाहुण्या, रावळ्यांच्या) हे सांगणे महत्वाचे. आमच्या एका मित्राच्या घरी ६ महिन्याच्या पिल्लाला एका गेस्टच्या मुलींनी अक्षरशः क्रेटमधुन ओढुन खेळल्या होत्या. ते पिल्लू पुढे २ दिवस पूर्ण झोपुन होते थकवणुकीने.

पाहुणे मंडळी आणि भुभु -

बर्‍याचवेळा असे होते की घरी आलेल्या पाहुण्यांना कुत्र्याची भिती, दहशत, अ‍ॅलर्जी असू शक्ते. अशावेळी भुभु आणि पाहुणे यांना एकमेकांपासून दूर ठेवावे. भुभू कंफर्टेबली आपल्या घरी वावरु शकेल आणि पाहुणे पण कंफर्टेबल असतील असे पहावे. त्याकरीता पेट गेट्स किंवा बेबी गेट्स हा चांगला उपाय ठरतो, घरातला एखादा भाग बाकिच्या भागापासुन आयसोलेट करता येतो.

Happy reading! Good luck to you to find a great dog. Every dog needs a responsible owner to be happy and healthy :)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle