रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- मुळ्याचे लोणचे

वडे, भजी, कबाबमें ये लोणचं किधरसे आया असं वाटलं का? पण हा आपला लाल मुळा आहे आणि लाल "चटणी, लोणचे, कोशिंबीर" (तसंच हिरवी पेये) अजून चालू आहेत त्यामुळं याचं लोणचं केलंय.

साहित्य-
२ कप लाल मुळ्याचे तुकडे, पातळसर तुकडे किंवा जाड किसला तरी चालेल
१ टेबलस्पून मोहरी
१ टीस्पून मेथी
१ टीस्पून बडिशेप
२ टीस्पून लाल तिखट
थोडा हिंग आणि हळद
मीठ
साखर
२ टेबलस्पून तेल
अर्ध्या लिंबाचा रस

कृती-
मोहरी, मेथी आणि बडिशेप थोडी भरड कुटावे. मोठ्याच कढईत तेल तापवून घ्यावे. मग लो हीटवर त्यात हिंग हळद घालून मग भरडलेली मोहरी, मेथी आणि बडिशेप घालावी. तिखट घालून गॅस बंद करावा. तिखट करपू देऊ नये.
मग त्यात मुळ्याचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करावे. थंड होऊ द्यावे, मग मीठ-साखर, लिंबाचा रस घालावा आणि बाटलीत भरुन ठेवावे. नंतर अजून रस सुटतो. फोडी रसात बुडतील तेवढ्या खाली ढकलून ठेवाव्या.
"मूली का अचार" करतातच. बडिशेपेऐवजी ओवा घालू शकता. एका टीव्ही शोमध्ये वेस्टर्न स्टाईल "पिकल्ड रॅडिशेस" बर्गरसवर घातलेले पाहिलेत.

20160403_164634-1.jpg

मार्क - ६ (बहुतेक)

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle