वडे, भजी, कबाबमें ये लोणचं किधरसे आया असं वाटलं का? पण हा आपला लाल मुळा आहे आणि लाल "चटणी, लोणचे, कोशिंबीर" (तसंच हिरवी पेये) अजून चालू आहेत त्यामुळं याचं लोणचं केलंय.
साहित्य-
२ कप लाल मुळ्याचे तुकडे, पातळसर तुकडे किंवा जाड किसला तरी चालेल
१ टेबलस्पून मोहरी
१ टीस्पून मेथी
१ टीस्पून बडिशेप
२ टीस्पून लाल तिखट
थोडा हिंग आणि हळद
मीठ
साखर
२ टेबलस्पून तेल
अर्ध्या लिंबाचा रस
कृती-
मोहरी, मेथी आणि बडिशेप थोडी भरड कुटावे. मोठ्याच कढईत तेल तापवून घ्यावे. मग लो हीटवर त्यात हिंग हळद घालून मग भरडलेली मोहरी, मेथी आणि बडिशेप घालावी. तिखट घालून गॅस बंद करावा. तिखट करपू देऊ नये.