हरियाली बार्ली:
साहित्यः
१ कप पर्ल बार्ली
हिरवा सॉसः
चिरलेली कोथिंबीर - १ वाटी,
थोडी पालकाची पाने,
पेरभर आलं,
चवीनुसार हिरव्या मिरच्या,
२ चमचे ऑऑ,
अर्धा चमचा लिंबाचा रस,
मिठ चवीनुसार.
सॅलड:
पालकाची पाने - बेबी स्पिनॅच,
ब्रोकोलीचे तुरे - थोडे वाफवुन (क्रंची रहिले पाहिजेत),
ग्रिल्ड झुकुनीचे तुकडे (ऐच्छिक),
रोस्टेड रेड कॅप्सिकमचे तुकडे (ऐच्छिक),
सजावटीसाठी:
कोथिंबीरीची पाने
थोडे क्रम्ब्ड पनीर / रिकोटा चीझ (ऐच्छिक)
थोडे अक्रोड / काजु (ऐच्छिक)
कृती:
१. पर्ल बार्ली निवडुन, स्वच्छ धुवुन उकडुन घ्या. उकडताना त्यात थोडे मिठ आणि २-४ थेंब तेल घाला.
२. चटणीसाठी दिलेले सर्व जिन्नस मिक्सरवर वाटुन घ्या. फार गुळगुळीत वाटु नका...
३. उकडलेली बार्ली थम्ड झाली की त्यात आपल्या चवीनुसार तयार सॉस मिसळा.
४. त्यात आत सॅलडसाठी दिलेले जिन्नस घालुन हलक्या हाताने मिक्स करा.
५. कोथिंबीरीची पाने आणि क्रम्ब्ड पनीर / रिकोटा घाला. मी वरतुन थोडे चिली ऑईल चे थेंब घातले.
थोडे गार करुन सर्व्ह करा :)
अधिक टीपा:
- पर्ल बार्ली आधी थोडावेळ (२ एक तास)प्पाण्यात भिजवुन ठेवल्यास लवकर शिजते. शिजवताना पार्ली एकदम नरम शिजवू नका.. थोडा बाईट असू दया. उन्हाळ्यात बार्ली खावी / बार्ली लिंबु सरबत / बार्ली वॉटर घेतल्याने उन्हाळा बाधत नाही..
- चटणीसाठी वापरलेले जिन्नस आपल्या आवडीनुसार बदलु शकता.
- सॅलड साठी वापरलेले जिन्नस आपल्या आवडीनुसार बदलु शकता. त्यात चिकनचे तुकडे, कॅन्ड टुना फ्लेक्स इ इ पण घालु शकता.
- बार्ली व्हर्सटाईल आहे. मी शिजलेल्या बार्ली चे २ पोर्शन्स करुन एक पोर्शन हवाबंद डब्यात फ्रिजमधे ठेवते. १ कप बार्ली चे मला २ वेळा भरपूर सॅलड बनवता येते.
- यात कुठलीही चटणी/ उकडलेल्या, ग्रिल्ड किंवा कच्च्या भाज्या / कुठल्याही सॅलडची पाने घालुन झटपट वन डिश मील तयार होते.