सृजनाच्या वाटा - रंग खेळू चला - 'काटी रोटी'

काटी-रोटी:

IMAG1258.jpg

साहित्यः

रोटी:

१ कप होलमिल सेल्फ रेसिंग फ्लार (किंवा १ कप मैदा/कणिक_+ १ टीस्पून बेकिंग पावडर एकत्र चाळून),
१ चमचा ऑऑ / तेल
थोडे लेमन झेस्ट (ऐच्छिक)
चवीला मिठ
पाणी

स्टफिंगसाठी:

पिवळ्या कॅप्सिकमचे चोटे तुकडे - १ वाटी
अर्धी वाटी स्वीट कॉर्न्चे दाणे,
१ छोटा कांदा - बारीक चिरून,
१-२ लसूण पाकळ्या बारीक चिरून्/ठेचुन
अर्धी वाटी चिझ (पिझ्झा/मोझरेल्ला/कोल्बी/टेस्टी/अमूल)
बारीक चिरलेली कोथिंबीर / पार्सली
मिठ आणि पांढरी मिरेपूड चवीला.

IMAG1261.jpg

कृती:

१. स्टफिंगसाठी देलेल्या जिन्नसांपैकी कोथिंबीर आणि चिझ वगळून बाकी पदार्थ एका मावे सेफ बोल मधे एकत्र करा आणि मावेमधे मिडिअम पॉवरला अर्धवट शिजवुन घ्या. जरा गार होऊ द्या. रुम टेंपरेचरला आले की त्यात चिझ आणि कोथिंबीर/पार्सली घाला.

२. रोटीसाठीचे जिन्नस, पाणी वगळून, एकत्र करुन घ्या. यात थोडे थोडे पाणी घालुन मऊसर कणिक मळा. तेलाचे बोट लावुन ५-१० मिनीटे झाकुन ठेवा.

IMAG1249.jpg

३. १० मिनीटांनय, तयार कणकेची २-३ भाग करा, पोळपाटावर्/बोर्डवर/किचन प्लॅटफॉर्म्वर थोडे पिठ भुरभुरुन त्यावर एक उंडा ठेवा आणि जाडसर रोटी लाटा. थिकनेस पोळीपेक्षा जाड...धपाटा किंवा पिझ्झा बेस इतका थिक साधारण ३ एक मिलीमिटर :ड

४. तापल्या तव्यावर थोडे तेल घालुन रोटी एका बाजुने अर्धव्ट शेका..थोडे लालसर डाग दिसायला लागले की पालतुन दुसर्या बाजुने असेच अर्धवट शेका.

IMAG1255.jpg

५. ही अर्धवट रोटी तव्यावरुन काढुन एका धारधार सुरीने मधुन कापा.

६. कापलेल्या रोटीच्या एका भागावर तयार स्टफिंग पसरा आणि त्यावर हवे तर एक्स्ट्रा चिझ घाला. रोटीचा दुसरा भाग त्यावर ठेवा आणि रोटी परत पूर्ण भाजण्यासाठी तापल्या तव्यावर ठेवा.

IMAG1252.jpg

७. आता रोटी दोन्ही बाजुंनी खरपूस भाजुन घ्या.

८. गरम रोटीवर थोडे बटर लावुन आपल्या आवडत्या सॉस्/डीप बरोबर सर्व्ह करा.

IMAG1259.jpg

अधिक टीपा:

- ही रोटी साधारण स्टफ्ड पिझ्झा टाईप्स लागते.

- स्टफिंगसाठी आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या वापरू शकता. मी श्रेडेड ग्रिल्ड चिकन घालुन पण केली आहे.

- ही रोटी दुसर्‍या दिवशी ग्रिलपॅनवर गरम करून पण चांगली खुसखुशीत लागली.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle