'रेड रायडिंग फूड' - लंच ऑन द गो
साहित्यः
सॅलड्साठी:
- अर्धी वाटी लाल कोबी - पातळ चिरून,
- अर्धी वाटी गाजराचे तुकडे - लांबट चिरून (मॅचस्टिक साईझ),
- अर्धी वाटी लाल कॅप्सिकमचे तुकडे - लांबट चिरून (मॅचस्टिक साईझ),
- अर्धी वाटी पातीचा कांदा - कांदा बारीक चिरून घ्या आणि पातीचे पण पातळ काप करून घ्या (ऐच्छिक)
अॅपल चटणी:
- अर्धे लाल सफरचंद - किसून,
- छोटा तुकडा आलं - किसून,
- लिंबाचा रस, कश्मिरी लल तिखट, मिठ आणि किंचित साखर
ड्रेसिंगः
- स्वीट चिली सॉस,
- थोडे किसलेलं आलं,
- २-४ थेंब सोया सॉस (ऐच्छिक)
- लाल मिरचीचे बारीक तुकडे (ऐच्छिक)
- थोडे पाणी
इतर साहित्यः
- घट्ट झाकणाची बरणी / डब्बा,
- घट्ट झाकणाची छोटी डब्बी,
- फोर्क / चॉपस्टिक्स
कृती:
१. सॅलडसाठी दिलेल्या जिन्नसांचे बरणी मधे थर लावुन घ्या.
२. अॅपल चटणीचे सर्व जिन्नस एकत्र कालवा आणि सॅलडच्या थरावर (अगदी टॉप लेयर) पसरा. बरणीचे झाकण घट्ट बंद करा.
३. ड्रेसिंग साठी दिलेले जिन्नस एकत्र करा. ड्रेसिंगमधे पाणी फार घालू नका... साधारण पातळ ठेवा. हे घट्ट झाकणाच्या डब्बीत भरा.
४. इन्स्युलेटेड लंच बॅग मधे, आईस ब्रिक्/ब्लॉक ठेवुन त्यात सॅलडची बरणी आणि डब्बी ठेवा. सोबत फोर्क / चॉपस्टिक्स ठेवा आणि बॅग घेऊन निघा... :ड
५. खाताना, सॅलडवर आवडीनुसार हवे तेव्हढे ड्रेसिंग घाला, मिक्स करून खा :)
अधिक टीपा:
- पातीच्या कांद्या ऐवजी राईस नुडल्स / वाफवलेले चिकनचे तुकडे / कुक्ड प्रॉन्स घलुन बघता येइल.
- घरीच खाणार असाल तर वरतून टोस्टेड तीळ / भाजलेल्या शेंगदाण्याचे भरड तुकडे घाला - मस्त क्रंची लागत.
- हे सॅलड शक्यतो थंडच खा. ऑफिस मधे गेल्यावर जेवेपर्यंत फ्रिज मधे ठेऊन द्या.