गंध हे दरवळणारे

१) कधी उमलतोय आणि आपला सुगंध आसमंतात दरवळवतोय अस झालय.

२) हे आमच्या कुंडीत फुललेल मे फ्लावर. जणूकाही सृष्टीतील आनंद साजरा करणारा फुलबाजाच.

३) आम्ही क्वचीतच फुलतो. पण फुलाव तर आमच्यासारख स्वतःबरोबर ज्यांनी आधार दिला त्यांनाही आपल्या सुगंधाने,अस्तित्वाने सुशोभीत कराव.

४) आम्हीच आमची वेणी गुंफली.

आमचे गुच्छही आम्ही असे एकमेकांचे हात धरून, एकत्र राहून बनवतो.

५) आज कसा मनासारखा पाऊस अंगावर रिमझिमला. चिंब चिंब झाल.

६) राणीच्या बागेत तुमच स्वागत आहे अश्या पोज मध्ये हे फुल राणीच्या बागेत होत.

७) नाव माझ पावडर पफ असल तरी त्याहून मी खुप नाजूक आहे.

८) फुलांचे राजे म्हणतात आम्हाला.

९) आम्हाला बाई स्वच्छ, शुभ्रच आवडत.

१०) अय्या, कोण आल?

११) आकाशाकडून रंगाची उधळण घेऊन आलोय आम्ही.

खालचे फोटो माझी मुलगी श्रावणी हिने काढलेत. माझ्या माहेरी.

१२)लहान मुलांचे फ्रॉक, पर्सला अशी फुले किंवा बटन्स किती छान दिसतील.

१३) अगो बाई कॅमेरा हातात धरण्याएवढी इतकी मोठी झालीस लगेच अस म्हणत आहे ते फुल.

१४) हे फुल वळून वळून सांगत आहे "एक माझा पण काढ ना एक छानसा फोटो, डिपी ठेवता येईल असा".

१५) इश्य बाई (लाज वाटते).

१६) वर्षोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle