मार्च मधले असे सूर्य, उन यांच्या सोबतचे काही दिवस गेले की आपण खुश होतो, पण अजून थंडीची एक शेवटची लाट येणे बाकी असतं. आपला उत्साह कधी कधी, खास करून सुरुवातीला पहिल्या दोन तीन वर्षात असा असतो, की मोठे जॅकेट्स, बूट सगळे नीट पॅक करून कपाटाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात टाकले जातात. सवयीने मग हे उन फसवं आहे, अजून एक किंवा दोन वेळा थंडी पाऊस, जोरदार वारा यांची भेट व्हायची आहे हे समजायला लागतं.
कित्येक रूपांत ही वेगवेगळी फुलं आपलं मन मोहवत असतात. कधी त्यांच्या सुवासाने तर कधी नजर हरखून जाईल अश्या रंगांनी फुल आपलं अस्तित्व दाखवत असतात, आपलं भावविश्व समृद्ध करत असतात. मनाचा हळवा कोपरा जपणारी ही फुलं म्हणूनच तर कित्येक कविता, गाणी फुलांशिवाय अपूर्ण असतात.
स्टॉकिंगची जाळीदार फुले मी शाळेत असतानाच मैत्रीणीकडून शिकले होते. पुन्हा एकदा करुया व मुलीला शिकवूया ह्या उद्देशाने मी ही फुले मुलीच्या मदतीने तिला शिकवत शिकवत केली. वॉट्स अॅप वर फोटो पाहून माझ्या काही माबोकर मैत्रीणींनी ह्याची कृती विचारली होती. ती खालील प्रमाणे. अजून खुपसे प्रकार नेटवर सापडतील ह्या फुलांचे वेगवेगळे आकार आणि गुच्छही.
मी हे सामान दादर वरून सौभाग्य वस्तू भांडार मधुन घेतले. त्यांना स्टॉकिंगच्या फुलांचे सामान द्या सांगितले की ते खालील सगळ्या वस्तू दाखवतात. रंग आपल्या आवडीनुसार घ्यायचे.