मार्च मधले असे सूर्य, उन यांच्या सोबतचे काही दिवस गेले की आपण खुश होतो, पण अजून थंडीची एक शेवटची लाट येणे बाकी असतं. आपला उत्साह कधी कधी, खास करून सुरुवातीला पहिल्या दोन तीन वर्षात असा असतो, की मोठे जॅकेट्स, बूट सगळे नीट पॅक करून कपाटाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात टाकले जातात. सवयीने मग हे उन फसवं आहे, अजून एक किंवा दोन वेळा थंडी पाऊस, जोरदार वारा यांची भेट व्हायची आहे हे समजायला लागतं.
"फागुन आयो रे" म्हटलं की कसं होळी, धुळवड आणि आपली रंगपंचमी आठवते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते.
होली आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव! आपण रंग उधळतो, उडवतो, लावतो.. पण कोणाच्याही अंगभूत रंगाला विसरुन कसं चालेल? यावेळी आपण या उत्सवात अंगभूत रंगांचा खेळ खेळणार आहोत.
कधी, कुठे, कसा आणि कोणाबरोबर खेळायचा?
लवकरच कळवू.
मध्यंतरी काही काळ झालेल्या ब्रेकनंतर आपण पुन्हा सृजनाच्या वाटांकडे वळणार आहोत. तर मैत्रिणींनो, नव्या जोमाने तयार रहा!