"फागुन आयो रे" म्हटलं की कसं होळी, धुळवड आणि आपली रंगपंचमी आठवते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते.
होली आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव! आपण रंग उधळतो, उडवतो, लावतो.. पण कोणाच्याही अंगभूत रंगाला विसरुन कसं चालेल? यावेळी आपण या उत्सवात अंगभूत रंगांचा खेळ खेळणार आहोत.
कधी, कुठे, कसा आणि कोणाबरोबर खेळायचा?
लवकरच कळवू.
मध्यंतरी काही काळ झालेल्या ब्रेकनंतर आपण पुन्हा सृजनाच्या वाटांकडे वळणार आहोत. तर मैत्रिणींनो, नव्या जोमाने तयार रहा!
लहानपणापासून वॉटरकलर खूप आवडायचे. एलिमेंटरी आणि इंटर्मीजिएट च्या सरावामुळे तर वेडच लागले लँडस्केप चे.. मग कॉलेज, मित्रमैत्रिणी, ऑफीस, नवरा या सगळ्या पसार्यातून अज्जिबात वेळ मिळाला नाही.. पण जमेल तसा वेळ स्वत:ला देऊन केलेल हे काम!! बर्याच्श्या कॉपीज आहेत (मिलिंद मुळीकांच्या वॉटरकलर मधून.. वॉटरकलर चा देव माणूस )
आणि काही क्राफ्ट सुद्धा.
पहिलीच पोस्ट आहे.. शुद्धलेखनास दिवे घ्या :confused: