स्टॉकिंग फ्लवर्स

स्टॉकिंगची जाळीदार फुले मी शाळेत असतानाच मैत्रीणीकडून शिकले होते. पुन्हा एकदा करुया व मुलीला शिकवूया ह्या उद्देशाने मी ही फुले मुलीच्या मदतीने तिला शिकवत शिकवत केली. वॉट्स अ‍ॅप वर फोटो पाहून माझ्या काही माबोकर मैत्रीणींनी ह्याची कृती विचारली होती. ती खालील प्रमाणे. अजून खुपसे प्रकार नेटवर सापडतील ह्या फुलांचे वेगवेगळे आकार आणि गुच्छही.

मी हे सामान दादर वरून सौभाग्य वस्तू भांडार मधुन घेतले. त्यांना स्टॉकिंगच्या फुलांचे सामान द्या सांगितले की ते खालील सगळ्या वस्तू दाखवतात. रंग आपल्या आवडीनुसार घ्यायचे.

ह्यात आहे स्टोकिंगचे कापड, पराग कण, गोल्डन तार. (सिल्व्हर पण असते), देठासाठी पट्टी.

आपल्याला फुल जेवढ्या आकाराचे बनवायचे आहे त्याप्रमाणे एखादी नेलपेंट किंवा इतर बाटली घ्या. त्या बाटलीला तारेचे वरचे टोक गोलाकार गुंडाळा खालील प्रमाणे.

बाटली त्यातून काढलीत की असा आकार येईल.

आता स्टॉकिंगच्या कापडाच्या वरच्या भागापासून सुरुवात करा. जेवढी मोठ देठ हव तितकी तार तोडून घ्या. तार कैचीनेही कापता येते. पण जुनी कैची वापरा म्हणजे कैचीची धार जायला नको. कापड तारेला हलक्या हाताने खेचून बांधा. जेवढे खेचाल तेवढी चांगली जाळी पडेल. पण पाकळीचा शेप बदलू देऊ नका जास्त ताणून.
बाकीचे कापड पाकळी पासून कापा.

आता खालचे जास्तीचे बाहेर आलेले कापड पण जरासे कापा. आता पाकळीला लागून हिरवी पट्टी तारेला गोल गु़ंडाळून अर्धवट देठ बनवा. ह्या अर्धवट देठामुळे फुलाला जोडणार हिरवा फुगीर भाग तयार होईल. पुर्ण फुलाचे देठ नंतर येईल. हया पट्टीला गम असतो सेलो टेप सारखा. ती चिकटत जाते.

आता पराग एका तारेत अडकवून बांधून घ्या.

आता पाच किंवा मावतील तेवढ्या पाकळ्या एकत्र करून पराग असलेली तार मध्ये ठेवा. परागकण निट पाकळ्यांच्या आत घ्या व पाकळ्यांच्या तारा एकमेकात गुंतवून एकत्र करून फुल तयार करा. ह्या पूर्ण फुलाच्या देठाला हिरवी टेप लावा म्हणजे आता देठ तयार होईल.

हे झाले पुर्ण फुल.

आता अशी अजुन फुले बनवून ती एकत्र तारेने बांधून फुलांचा गुच्छ तयार झाला.

माझ्या मुलीने हा फ्लॉवर पॉट (घरी पडून असलेला पॉट रंगवून) बनवून माझ्या पुतण्याला म्हणजे तिच्या दादाला वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिला.

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle