कोणत्याही भाजी/पालेभाजीचे देठ. जे आपण खातो. लाल हवेत म्हणजे यात माठ-पोकळा, आपला रेड चार्ड आला. तर ही चार्डाच्या देठांची कोशिंबीर. अगदी सोपी.
साहित्य-
चार्डचे देठ- चिरुन वाटीभर
भाजलेल्या तिळाचं कूट- १ चमचा
तिखट
मीठ
साखर
दही
फोडणी- तेल, हिंग, मोहरी, जिरे.
कृती-
चार्डचे देठ चिरुन मग वाफवू शकता किंवा वाफवून मग मॅश करु शकता. झाकण ठेवून फार शिजवले तर रंग बदलेल! अगदी लगदा होऊ देऊ नये. मायक्रोवेव्हमध्ये केले तरी चालेल. मग त्यात तिळाचं कूट, चवीला तिखट, मीठ, साखर घालून कालवावे मग दही घालून मिसळावे.
वरुन हिंग-मोहरी-जिर्याची फोडणी द्यावी.