उन्हाळ्याच्या सुट्टीचा आळस झटकायला म्हणून शुक्रवारी घरात आहेत त्या फुलांमधे वेगवेगळ्या रचना करुन बघत होते.
नंतर लक्षात आलं की ह्यामधे केशरी, पांढरा आणि हिरवा रंग जास्तीत जास्त आहेत. आणि क्लिक झालं की ह्या रचना "तिरंगा" मधे टाकता येतील. :)
रचना करताना मला फक्त वेगवेगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन्स करुन बघायची होती. त्यामुळे करताना सगळी "फ्री स्टाइल"च आहे. कोणतीही इकेबानाची तंत्र ह्यामधे वापरलेली नाहीत.
घरच्या मिरच्या आणि मोगर्याचे फूल वापरुन "तिरंगा" उपक्रमासाठी मिरची आर्ट!
ऑस्ट्रेलियात १५ तारीख लागली म्हणून पोस्ट करत आहे. इकडे अजून १२ तासांनी लागेल.