झुंजुमुंजु झालं. पहाट वारा स्वतःबरोबर केशरी देठाच्या पारिजातकाचा मंद सुवास वाहून आणत मन प्रसन्न करीत होता. काही वेळातच पूर्व दिशा उजळू लागली. चैतन्यमय अशा सोनेरी केशरी, गुलाबी रंगांनी. अहाहा ! निसर्गाने केलेली ही केशरी उधळण सार्या सॄष्टीच्या तनामनांत सळसळता उत्साह जागवते खरी. मी आहेच असा सार्या जगताला चैतन्य बहाल करणारा. केशरी रंग स्वतःवरच खूश होत विचार करत होता.