reuse

जुन्यातून नवे - कुर्त्यांपासून बेडशीट

मी कॉटनचे कपडे जास्त वापरते. आणि मधे कुर्त्यांची फॅशन होती तेव्हा आवडीने कॉटनचे कापड घेउन ५-६ कुर्ते शिवुन घेतले होते. तसेच काही मैत्रिणीनी दिलेले होते. प्रत्येक कापडामागे थोडी इमोशनल अटॅचमेंट असल्याने वापरुन झाल्यावर टाकून न देता ढीग करुन ठेवले होते. १२-१३ कुर्ते, २ कमिझ असे साठवून केलेले हे बेडशीट.

Keywords: 

कलाकृती: 

टाकाऊतून टिकाऊ -कमीझचे बेडशीट

माझे बरेच जुने सलवार कमीझ मी बाजुला ठेवुन दिले होते की यांचे काहीतरी करू म्हणुन. तसेच बर्‍याच ओढण्या पण ठेवल्या आहेत काहीतरी करु म्हणुन. तर त्याची एक बेडशीट बनवली. ५ टॉप + १ ओढणी असे मिळून हे बनवले आहे. थोडे दिवस का होईना बरे दिसेल असे वाटतेय :) घरच्यांना तरी आवडलेय रंग वगैरे. आयडिया माझ्या वहिनीच्या आईची. त्या असे बरेच काही काही करुन घेतात शिंप्याकडून. इथे शिंंपी आणि कष्टंबर आम्हीच! पेक दिवस पदर खोचून लावल्या कात्र्या टॉपना आणि हे बनवले!

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

Subscribe to reuse
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle