मी श्रीलंकेला जाणार हे डिक्लेअर केल्यानंतर बर्याच जणांनी का? हा प्रश्ण केला. त्यात काहीजणांच्या मते एवढे देश बघायचे राहिलेयत त्यात श्रीलंकाच का आत्ता? वगैरे प्रकारची कुतुहले होती. पण मी ठरवलं होतं मला श्रीलंकेला जायचय. त्याची कारणे कधीतरी डिस्कवरी वर पाहिलेला तो सर्वत्र असलेला हिरवा पाचूचा रंग, रत्नांच्या खाणीची वर्णने आणि मागच्या पाच -सहा वर्षांपासून बॉस कडून सतत ऐकलेली श्रीलंकेची स्तुती ही होती. (बॉस कोलंबोमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलचे सीईओ होते).
सो फायनली पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधनची सुट्टी येत आहे हे पाहून मी पटकन टिकीटे बुक करुन टाकली पुढचा काहीच विचार न करता...