इथं एकूण शिवणाबद्दल हल्ली बरंच बोललं जातंय. घरात मशीन असणं ही संधी, सोय आणि चैन सगळं आहे. दुरूस्त्यांपासून, रिसायकलिंग ते नवीन क्रिएटिव गोष्टी सगळं लिहीता यावं म्हणून हा धागा.
बऱ्यापैकी मोठं काम असेल. स्पेशल असेल किंवा इमोशनल व्याल्यू जास्त असेल तर नवा धागा काढा. जनरल छोट्या प्रोजेक्टसना प्रोजेक्ट करायला हा वापरू.
डिस्कस करू, चुका दुरूस्त करू, फिनेस कशी आणायची ते बोलू. टीपा देऊ.
जसं की आज मी 10 मिनीटात एका स्टोलचा स्कर्ट करून टाकला. त्या स्टोलचा वापर कमी आणि फॉल आवडेलसा नव्हता. पण रंग आणि प्रिंट आवडतं होतं. सो हा प्रयत्न.
विनीचा अपसायक्लिंगचा धागा आल्यापासुन डोक्यात होतं की एक कॉमन धागा काढूया, कारण आपण सगळेच काही ना काही रिसायक्लिंग किंवा अपसायक्लिंग करत असतो आणि आपण बनवलेल्या कलाकृतीचा आपल्याला मनोमन अभिमानही वाटतो. पण आपण प्रत्येकीने स्वतःच्या वस्तुंचा वेगळा धागा काढून त्यात फोटो टाकावेत एवढ्या क्वांटिटिमध्ये नसतात आपल्या वस्तु हे आपल्यालाही माहित असतं सो आपण बनवलेल्या अशाच थोड्या फार अपसायक्लिंगसाठी हा धागा वापरुया.