५२एच झी ५२ एच झी..... वेळी अवेळी, तप्त दुपारी, खोल रांगड्या महासागरी तू खर्ज स्वरात गाणे गात विहरतोस. बाहेरच्या जगाचे चटके बसले कि मी देखील अंतर्मनात एक सूर मारते. कितीक बोटी आल्या गेल्या अन काही चुकार पाणबुड्या़ काहींनी प्रदूषण केले काहींनी फेकली शिळी दया माझ्या अंतरंगातले गाणे कोणाला समजलेच नाही माझ्या अंतरंगातले गाणे कोणाला समजलेच नाही. तू कोण? एक मासा, एक जीव की एक अगम्य शक्ती? मी कोण ? एक स्त्री, एक शरीर की एक अव्यक्त व्यक्ती? जगण्याचे देणे देउन संपले कि उरलेल्या श्वासात, आता मला फक्त माझे सूर हवेत. अड कायचे नाहीए विषारी शैवालात Keywords: loneliest whale Read more about ५२एच झीLog in or register to post comments