सलवार-कुडते शिवुन झाल्यावर उरलेल्या कापडातुन हे शिवण्याच्या मशीन चे कव्हर शिवले आहे. पुढे व मागे ३ व २ खिसे शिवले आहेंत. त्यात टेप्,कात्री,दोरा,मोठ्या खिशात मशिन ची इलेच्टिक मोटर आणि वायर असे ठेवता येते.
कव्हर ला आतुन कडक पणासाठी काहीतरी हवे होते, पण कॅन्व्हास नको होते कारण ते धुतले कि आटते/चुरगळते.त्यासाठी जुन्या शॉवर कर्टन चा उपयोग केला आहे.थोडक्यात काय तर पैसे खर्च न करता मस्त कव्हर तयार झाले.