मातोश्रींच्या डोक्यात अचानक र्मदा परिक्रमा करायचे आले आहे. तिला मनापासून फिरायला आवडते. एकटीच असल्याने कोणी चांगली कंपनी मिळाली की तिचे बेत आखणे सुरू होते. अजून छान चालते फिरते आहोत तो पर्यंत भारत फिरणे ही इच्छा! परवा एका नर्मदा परिक्रमेचे पत्रक मला पाठवून याला मी जाऊ का अशी विचारणा झाली आहे. मी ते पत्रक बघितले तर मला काही गोष्टी खटकल्या म्हणून तिला मी थोडी माहिती काढते असे सांगून थोपवले आहे. तर मला थोडी माहिती हवी आहे.