गाठ तिचा शालु त्याचा शेला त्यांची मारलेली गाठ, कायमचीच... खरतरं एकमेकांना दिलेलं साताजन्माचं वचन अखेरपर्यंत निभावण्यासाठी! त्याने वागावं कसही तिला स्त्रीत्त्वाचं दडपण तिचं दडपण ही त्याला अनोळखी तो मात्र मश्गुल, आपल्याच विश्वात! तिच्या विश्वकोषात मात्र, 'स' ची बाराखडी, संयम, समजुतदारपणा, सहनशीलता, सोज्वळ, आणखीही बर्या,च अपेक्षांची ओझी त्याच्याकडे मात्र एकच शब्द आणि तो ही अंतिम... "पुरुष" आणि ती मात्र अजुनही अडकलेली त्याच लडिवाळ गाठीमध्ये.... Keywords: Gath Read more about गाठLog in or register to post comments