चित्रपट सुरू होतो तोच पुजोबाडीच्या उत्साहित करणार्या, प्रफुल्लित वातावरणात, तयारी चालली आहे . लगबग, गडबड संगीत... सुस्नात, सिंदूर लावलेल्या लाल काठाच्या साड्या नेसलेल्या वंगललना कामात मग्न आहेत. मुले धडपडत आहेत. बाप्ये गप्पा मारत बसले आहेत. ह्याचे एक केंद्र आहे ती मूर्ती आणि दुसरे आहे काकीमा/ बौदी परमा चौधरी, धाकटी सून. म्हणजे आपली राखी - इतके सोज्वळ खानदानी सौंदर्य, त्यातही फारशी जाणीव न ठेवलेले. घरकामात, पूजेच्या तयारीत मग्न.