डिस्क्लेमरः
१. या लेखात आयसीआयसीआय बँक आणि अमाझॉन चे प्रमोशन केलेले नाही.माझा अकाऊंट या दोन्ही वर आणि स्क्रिनशॉट घेणे सोयीचे या एका कारणा खातर हे दोन ब्रँड वापरले आहेत.तुम्ही भरवश्याच्या झुमरीतलैय्या.इन वरुन शॉपिन्ग करुन भरवश्याच्या टिम्बक्टू बॅन्केने ऑनलाईन पे करु शकता.
२. हा लेख 'ऑनलाईन शॉपिन्ग' अडिक्शन ची भलामण करत नाही.
बरं का, पूर्वीच्या काळी एका देशात खूप दरोडेखोर होते.खजिना, सोनं नाणं,दागिने काही एका गावातून दुसर्या गावी नेताना हे दरोडेखोर सर्व लुटून न्यायचे.जनता त्रस्त झाली होती.अश्यात राजाच्या मुलीचं लग्न होऊन ती एका लांबच्या राज्यात नांदायला जायची होती.राजा पडला चिंतेत.राजकन्येबरोबर दिलेला खजिना दरोडेखोर नक्की लुटून नेणार!!आता काय करावे?राजाने काढली एक युक्ती.त्याने राजकन्येच्या पालखीबरोबर काही सोनं नाणं न देता फक्त एक चिठ्ठी दिली."ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्यास इतकी सोन्याची नाणी द्यावी".दरोडेखोर अपेक्षेप्रमाणे जंगलात खजिना लुटायला आले.पण त्यांना काहीच मिळाले नाही.(आणि ते अमरीश पुरी/शक्ती कपूर/गुलशन ग्रोव