कवीता होस्मानीला लहानपणा पासून सूफी गायिका व्हायचं होतं पण आजपर्यंत तिला नशिबाने तशी संधी दिली नाही. चार वर्शाची असताना तिचे वडील वारले. आई कामाठीपुर्यात वेश्या व्यवसाय करत असे. कविताने अगदी लहानपणापासून जीवनाची कृर बाजू अनुभवली आहे. आणि आता ती व तिच्या १४ मैत्रीणी आपले अनुभव एडिंबरा फ्रिंज फेस्टिवल मध्ये जगाला सांगत आहेत. कोणताही अभिनिवेश नाही. ना लोकांकडून दयेची अपेक्षा. त्यांच्या जीवनकथा आहेत व त्यात त्यांची काहीच चूक नाही जसे आहे तसे ऐकवत आहेत.
क्रांती ही समाजसेवी संस्था कामाठी पुर्यातील वेश्यांच्या मुलींचे जीवन मार्गी लावण्याचे काम करत आहे.