कर्क रोग होण्याची कारणं थोडक्यात आपण मागील भागात पहिली. या भागात आपण कर्क रोगाचे लवकर निदान करता येऊ शकतं का नाही त्यावर चर्चा करूया. प्रत्येक रोगाचं कमीत कमी दोन प्रकारच representation असतं - १. Physical २. molecular. पहिलं तसं म्हंटलं तर दुसऱ्यावर अवलंबून असतं. Physical representation म्हणजे काय? दृष्टी, स्पर्श किंवा इतर संवेदनातून ज्याची जाणीव होते, ज्याला आपण बरेचदा रोगाची लक्षणं दिसणे असं म्हणतो. दीर्घकाळ हळू हळू वाढणाऱ्या बाकीच्या रोगांप्रमाणेच जसे की मधुमेह, कर्क रोगाची लक्षणे पटकन लक्षात येणं अवघड असतं.