चिंगु आणि पिंगू नावाचे दोन चतुर भाऊ बहिण होते. दोघांचेही डोळे मोठ्ठे चकचकीत होते. पंख सुद्धा आईसारखेच सुंदर पारदर्शक होते. शेपुट मात्र अजून छोटुशीच होती. हो! अजून दोघे छोटेच होते ना. त्यामुळे त्यांची शेपटीही पिटुकलीच होती. कधी एकदा मोठे होऊ आणि छान आईसारखी लांब शेपटी होईल याची दोघे वाट बघत असत.
कथा - स्वप्नाली मठकर
कथाकथन - अॅड. माधवी नाईक
पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू
निसर्गकथा : चिमण्या आणि डोंगर
हिवाळा सरत आला तसं चिमण्यांची दाणे शोधायची ठिकाणं दूरदूर व्हायला लागली. आसपासची सगळ्या शेतांची कापणी झाली. कुरणातले दाणेही संपत आले. म्हणजे अगदीच काही संपले नाहीत पण जास्त चिमण्या आल्या तर मात्र पावसाळा सुरु होई पर्यंत पुरले नसते. दूर दूर जाऊन खरंतर छोट्या चिमण्या दमून जायच्या. आता जवळच्या जवळ एखादी खाण्याची सोय करायला हवी हे सगळ्यांनाच वाटत होतं.
सध्या कोरोना विषाणुच्या साथीमुळे सगळेच घरात आहेत, किंवा घरून काम करत आहेत. घरात राहीलं की मुलांनाही काहीतरी वेगळं हवं असतं, त्यांचा वेळ जात नाही पण त्याचवेळी पालकांना सतत मुलांबरोबर खेळणंही शक्य नाही त्यामुळे हा एक नविन प्रयोग !