इथे आल्यावर पहिल्यांदी चाखलेला मेक्सिकन पदार्थ म्हणजे चिकन फहिता. स्पॅनिशमधे 'J' चा उच्चार 'ह' होतो हे महित नसल्याने ' हे फजिटा काय आहे' अस विचारुन स्वतःची फजिती करुन घेतलेली आजही आठवते. फहिता हा बीफचा स्कर्ट स्टेक हा भाग येतो त्या पासून करतात. पण माझ्या सारख्या बीफ न खाणार्यांसाठी चिकन फहिता हा प्रकार आहे.
फहितासाठी लागणारे साहित्य
२ बोनलेस चिकन ब्रेस्ट
१ कांदा उभा चिरुन
१ लाल किंवा हिरवी ढब्बू मिरची उभी चिरुन
१-२ टे स्पून तेल
६ ६- इंच वाल्या तॉर्तिया
जोडीला आवडी प्रमाणे
चिरलेला लेट्युस
१/२ कप किसलेले चिज
१/२ कप सॉवर क्रिम
ग्वाकोमोल
साल्सा किंवा पिको डे गायो