गऱ्याच्या पिठाची आंबील: उपवासाचा कोकणी पदार्थ
कोकणात उन्हाळ्यात कच्चे गरे लहान तुकडे करून वाळवतात आणि त्याचं पीठ करून ठेवतात जे श्रावणात उपासाला वापरतात.
साहित्य: एक वाटी पाणी, एक वाटी ताक, मीठ, साखर, जीरं, तूप, गऱ्यांचं पीठ तीन चमचे, मिरची एक
कृती: ताक आणि पाणी एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घाला. गऱ्यांचं पीठ नीट मिक्स करा. कढईत तुपाची जीरं आणि मिरचीचे तुकडे घालून फोडणी करा. त्यात तयार मिश्रण घालून ढवळत रहा. आंबील घट्ट होऊ लागली की गॅस बंद करा. उपासाला खात असाल तर वरून कोथिंबीर घालून गरमागरम प्या.
ही आंबील नाचणीसारखीच लागते, थोडा गऱ्याचा वास येतो.